आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अॅड. आव्हाड यांच्या अस्थींचे महाडच्या तळ्यात विसर्जन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माजलगाव | मानवी हक्क अभियानचे अध्यक्ष अॅड. एकनाथ आव्हाड यांच्या अस्थींचे महाडच्या चवदार तळ्यात विजर्सन करण्यात येईल, अशी माहिती त्यांचे सुपुत्र अॅड. मिलिंद आव्हाड यांनी दिली.
तेलगाव येथील नेलसन मंडेला वसाहतीच्या ठिकाणी बुधवारी अॅड.एकनाथ आव्हाड यांच्या रक्षा व अस्थी एकत्रीत करण्यात आल्या. या वेळी पत्नी गयाबाई, पुत्र मिलिंद मुलगी शालन, सुरेखा व जावई बाबासाहेब लाेखंडे यांच्यासह माजी अामदार सुनील धांडे, रवींद्र क्षीरसागर, विठ्ठल लगड, उत्तम डावरे, अशाेक तांगडे, एकनाथ मस्के, तुकाराम येवले उपस्थित होते. आव्हाड यांची रक्षा निलसन मंडेला वसाहतीमधील बाेधी वृक्षास टाकली जाणार आहे. याच ठिकाणी कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळावी म्हणून त्यांचे भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय ही मानवी हक्क अभियानच्या कार्यकर्त्यांनी घेतला अाहे.
बातम्या आणखी आहेत...