आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाचप्रकरणी कोर्टात साक्ष बदलण्यासाठी पुन्हा लाच

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली - लाच प्रकरणात साक्ष फिरवण्यासाठी 50 हजारांची लाच देताना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील अधिक्षक कालिदास निवृत्ती भरते याला मंगळवारी लाचपुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
भरते याने सातारा जिल्ह्यातील बनवडी येथील हंगामी शिक्षक सुनील शिवाजी माने यांच्याकडून रजाकालीन पगाराच्या प्रस्तावास मान्यता देण्यासाठी 2006 मध्ये एक हजार रुपयांची लाच घेतली होती. या प्रकरणी भरते याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाची विशेष न्यायालयात सुनावणी सुरू होती. भरते याने काहीतरी कारणे सांगून 33 वेळा न्यायालयीन सुनावणी पुढे ढकलली होती. दरम्यानच्या काळात त्याने माने यांना ‘एक लाख रुपये देतो; मात्र कोर्टात माझ्याविरुद्ध साक्ष देऊ नका’ अशी ऑफर दिली होती. त्यातील 25 हजार रुपये माने यांना दिलेही होते. पुन्हा 11 ऑगस्टला 25 हजार रुपये दिले होते. मंगळवारी तो 50 हजार रुपये घेऊन येथे आला असता माने यांनी याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कल्पना दिली. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक हेमंतकुमार तोडकर यांनी सापळा रचून भरतेला अटक केली.