आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • British Laws Change For Farmers Aid, Said Transport Minister Divekar Raute

शेतक-यांना मदतीसाठी ब्रिटिश कायदे बदलणार, परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची माहिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली - ‘दुष्काळ असो वा अवकाळी पाऊस, नुकसान झालेल्या सर्वच शेतक-यांना चांगली भरपाई देण्याचा निर्णय युती सरकारने घेतला आहे. त्याआड येणारे ब्रिटिशकालीन कायदेही बदलण्याचे आमचे धोरण आहे’, असे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी रविवारी सांगलीत स्पष्ट केले.

रावते म्हणाले, ‘मागील सरकारने तिजोरी रिकामीच केली नाही तर ३ लाख कोटींचे राज्यावर कर्ज करून ठेवले आहे. आता आपल्याला कोणीही कर्ज द्यायला तयार नाही, तरीही आम्ही शेतक-यांना न्याय मिळवून देण्याच्या हेतूने ७ हजार कोटींचे तातडीच्या मदतीचे पॅकेज जाहीर केले. शिवाय ३५ हजार कोटींचा आराखडा तयार केला आहे. त्यातून सिंचन योजना पूर्ण केल्या जातील. अवकाळी पावसाने सांगलीतील द्राक्षे, ऊस, डाळिंब, मकाचे नुकसान झाले आहे. त्याचा अहवाल साेमवारी मुख्यमंत्र्यांना देणार आहे. नुकसान झालेली मका, ज्वारी, ऊस ही पिके दुष्काळी भागात चारा म्हणून देता येतील. सरकारने तशी वैरण खरेदी करावी द्यावा’, अशी सूचना विधीमंडळात मांडणार असल्याचे रावते यांनी सांगितले.

शेतक-यांची पदयात्रा आज मुख्यमंत्र्यांच्या घरी
सेवाग्राम येथून निघालेली शेतक-यांची पदयात्रा सोमवारी नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी धडकणार आहे. शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते व किसान अधिकार अभियानातर्फे या पदयात्रेचे आयोजन केले आहे. त्यात वर्धा, चंद्रपूर, वाशीम, वणी, यवतमाळ, नागपूर जिल्ह्यातील शेतकरी सहभागी झाले आहे. केंद्राने अजून मदत जाहीर केलेली नाही. ती मदत गृहीत धरून सरकारने पॅकेज कसे काय जाहीर केले? असा सवाल चंद्रकांत वानखेडे यांनी उपस्थित केला.

संकटावर धैर्याने मात करा : राज ठाकरे
‘अस्मानी संकटामुळे शंभर टक्के द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे मी तुम्हाला धीर देण्यासाठी आलोे आहे. तुम्हाला कर्जमाफी आणि नवीन पीक कर्ज मिळावे, यासाठी मी मुख्यमंत्र्याची भेट घेऊन मागणी करणार आहे,’ असे आश्वासन मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी नुकसानग्रस्त शेतक-यांना दिले. आत्महत्या करणे हा काही उपाय नसून संकटावर धैर्याने मात करा, असे आवाहनही त्यांनी केले. नाशकातील गारपीटग्रस्त गावांना भेट देऊन ठाकरे यांनी शेतक-यांच्या व्यथा जाणून घेतल्या.