आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोल्‍हापूरात खासगी बसला आग; 2 तरुणांचा होरपळून मृत्‍यू, 16 प्रवाशांना वाचवण्‍यात यश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काेल्हापूर- मडगाव (गोवा) येथून मुंबईकडे जाणाऱ्या एका खासगी आराम बसला शुक्रवारी सकाळी लागलेल्या अागीत दाेन जणांचा मृत्यू झाला. काेल्हापूरजवळ ही दुर्घटना घडली. बंटी भट (२२) आणि विकी भट (२४) अशी मृतांची नावे अाहेत, हे दाेघेही पुण्याचे रहिवासी अाहेत. सुदैवाने बसमधील इतर १६  प्रवाशांना वाचवण्यात यश अाले. या दुर्घटनेत बस जळून खाक झाली. 

 

गगनबावडा आणि कळे पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, शुक्रवारी पहाटे ३ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास मुंबईकडे जाणाऱ्या आत्माराम ट्रॅव्हल्सच्या खासगी बसला लोंघे गावाजवळ (ता. गगनबावडा) अचानक आग लागली. पहाटेची वेळ असल्याने बसमधील प्रवासी झोपेच्या अधीन होते. प्रसंगावधान राखून बस चालकाने लोंघे गावात बस थांबवली व प्रवाशांना जागे करून बाहेर पडण्यास सांगितले. त्यामुळे १६ जण बचावले. मात्र, बसच्या मागील बाजूस बसलेल्या विकी आणि बंटी भट यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. ते चार मित्रांसह गोवा येथे फिरावयास गेले होते. बसच्या वातानुकूलित यंत्रणेत बिघाड झाल्याने शॉर्टसर्किट होऊन ही आग लागल्याची माहिती आहे.  

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, पहाटे पेट घेतलेल्‍या बसचे फोटोज...

 

बातम्या आणखी आहेत...