आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बस दरीत उलटली, दोघांचा मृत्यू, 39 प्रवासी बचावले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा- सातारा-दहिवडीदरम्यान जाणारी एसटी बस शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास दरीत कोसळल्याने दोन प्रवासी ठार झाले, तर 39 जण जखमी झाले. सातारा जिल्ह्यातील वर्धनगडजवळील घाटात हा अपघात झाला. परिवहन मंडळाने सर्व जखमींना 500 रुपये तातडीची मदत दिली.

दहिवडी बसस्थानकातून सकाळी साडेदहाच्या सुमारास ही बस साता-याकडे निघाली. वर्धनगड घाटात असलेल्या पुलावर बस आली तेव्हा समोरून आलेल्या गाडीला चुकवण्याच्या नादात चालकाचा ताबा सुटल्याने बस सुमारे 60 फूट खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात दोन प्रवाशांची जागीच मृत्यू झाला, तर 39 जण जखमी झाले. यापैकी चौघांची प्रकृती गंभीर आहे. घटनेची माहिती मिळताच वर्धनगड येथील ग्रामस्थांनी अपघातग्रस्तांना दरीतून काढण्यासाठी तातडीने मदतकार्य सुरू केले. मिलिंद किसन भालेराव (रा. दहिवडी) असे एका मृताचे नाव असून दुस-याची ओळख पात्र पटली नाही.

अपघातात जखमी प्रवासी विकास भोंडे याने सांगितले की, पुलाजवळ समोरून दुसरी गाडी आल्याने चालकाला काय करावे ते समजले नाही. याच वेळी नियंत्रण सुटल्याने बस दरीत कोसळली. गाडीने चार-पाच कोलांटउड्या खाल्ल्या. आम्ही कसेबसे बसमधून बाहेर पडण्यात यशस्वी झालो. अनेकांचे हात, पाय तुटले, डोकी फुटली. जखमींच्या ओरडण्याच्या आवाज ऐकून ग्रामस्थांच्या मदतीने आम्ही काही प्रवाशांना बसबाहेर काढले.