आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बस चालवताना ड्रायव्‍हरचा हार्ट अटॅकने मृत्‍यू, झाडावर बस आदळून 30 जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - बस चालकाला ह्रदयविकाराचा झटका आल्‍याने मीरज-गणपतीपुळे एसटीचा अपघात झाला. या अपघातात 30 प्रवासी जखमी झाले अाहेत. तर, चालकाचा हृदयविकाराचा झटका आल्‍याने बसमध्‍येच मृत्‍यू झाला.
- बाबुराव सावंत असे हृदयविकाराने बसमध्‍ये निधन झालेल्‍या चालकाचे नाव आहे.
- पन्हाळा तालुक्यातील नावली गावाजवळ सकाळी साडेदहाच्‍या दरम्यान हा अपघात झाला.
- धावत्‍या बसमध्‍ये ही घटना घडल्‍याने झालेल्‍या अपघातात 30 प्रवासी जखमी झाले आहेत.
- हृदयविकाराच्‍या झटक्‍याने चालक सावंत यांचे नियंत्रण सुटले व बस झाडाला आदळली.
- अपघातातील जखमींवर कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
विश्‍लेषण - बस कर्मचा-यांचा वाढता ताण हा अपघातास कारणीभूत ठरू शकतो याबाबत वारंवार प्रश्‍न उपस्‍थित करण्‍यात आला आहे. पन्‍हाळा तालुक्‍यातील नावली गावाजवळ झालेल्‍या अपघातामुळे पुन्‍हा एकदा हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्‍यामुळे यातून प्रशासन काही धडा घेईल का? हा प्रश्‍नच आहे.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, संबंधित फोटो....