आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंबोली मध्ये कारला अपघात; पुलाच्या कठड्यावरून खाली कोसळली कार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर- आंबोली येथील हिरण्यकेशी फाट्या जवळ दारुच्या नशेत सुसाट वेगाने जाणाऱ्या स्वीफ्ट कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने कार थेट पुलाचा कठडा तोडून सुमारे 50 फुट खाली नदीत कोसळली घटना घडली. या अपघातात कारमधील चौघेजण ४ जण आश्चर्यकारकरित्या बचावले. एमपी ०९ सी ए ७६१० ही स्विफ्ट कार गोव्याहून कोल्हापुरच्या दिशेने  जात होती. यात चालकासह अन्‍य तीघे दारूच्‍या नशेत होते. कार चालक सचिन नाना निंबारे (36),मनीष राधाकीसन मरमठ (42),निरज देवेंद्रकुमार सूरी (36),जितेंद्र लक्ष्मणसिंग पिसोदीया (45) सर्वजण जखमी झाले आहे. 

 

अपघात झाला त्यावेळी रस्त्यावर कोणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला. अपघात झाल्यावर अपघातस्थळावरुन चालक गायब झाला होता. अपघाता नंतर मदतीसाठी आलेल्‍या स्थानिक नागरिकांना दारुच्या नशेत असलेल्या तिघांनी घाणेरड्या शिव्या देत १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहीकेला ही परत पाठवले. अपघाताची नोंद आंबोली पोलीस ठाण्यात झाली आहे.

 

परप्रांतीय कामगार बचावला
भरधाव वेगाने जाणारी ही कार नदीवरील पुलाचा कठडा तोडून नदीत कोसळत असताना खाली आंघोळ करणारा एका  परप्रांतीय कामगाराने  ( नाव समजू शकले नाही) प्रसंगावधान राखून तेथून पळ काढल्याने बचावला.

बातम्या आणखी आहेत...