आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cattle At Collector Office Ground :demand To Supply Water To Ten Villages

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जनावरे सोडून आंदोलन : दहा गावांना पाणी देण्‍याची मागणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली - म्हैसाळ योजनेचे पाणी मिरज तालुक्यातील दहा गावांना द्यावे, या मागणीसाठी भाजपचे आमदार सुरेश खाडे यांनी चार दिवसांपासून उपोषण सुरू केले आहे. मात्र, प्रशासन लक्ष देत नसल्याने सोमवारी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जनावरे सोडून आंदोलन केले. ग्रामस्थांनी रास्ता रोको करण्याचाही प्रयत्न केला.

मिरज तालुक्याच्या उत्तर भागातील सोनी, पाटगाव, कांचनपूर, भोसेसह दहा गावांना सध्या दुष्काळाच्या तीव्र झळा सोसाव्या लागत आहेत. म्हैसाळ योजनेतून पाइपलाइनद्वारे पाणी तासगाव तालुक्यात नेले आहे. या पाइपलाइनला व्हॉल्व्ह बसवून भोसे तलावात पाणी सोडल्यास तलावालगतच्या दहा गावांचा पिण्याचा पाणीप्रश्न सुटणार आहे. याबाबत मागणी करूनही पाटबंधारे विभागाने तलावात पाणी सोडले नाही. त्यामुळे आमदार खाडे यांनी चार दिवसांपासून उपोषण सुरू केले. मात्र, त्याची दखल घेण्यात आली नाही.

राजू शेट्टींचा पाठिंबा
प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे चिडलेल्या मिरज तालुक्यातील शेतक-या ंनी सोमवारी पहाटे अचानक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनावरे आणून बांधली. तसेच शहरातील मुख्य चौकांमध्ये चक्का जाम करण्याचा प्रयत्न केला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनीही खाडे यांची भेट घेऊन त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

आज मुंबईत बैठक
पाण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक झाल्याने अखेर शासनाला दखल घ्यावी लागली आहे. म्हैसाळ योजनेचे पाणी भोसे तलावात सोडण्याबाबत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी दुपारी 1 वाजता मुंबईत बैठक बोलावली आहे. या बैठकीत भोसे तलावात पाणी सोडण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे.