आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Central Minister Venkatesh Abadeo Speak About Conversion

स्वेच्छेने धर्मांतर केल्यास कोणीही विरोध करू नये- केंद्रीय मंत्री व्यंकटेश आबदेव यांचे आवाहन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सातारा - सध्या देशात सुरू असलेले धर्मांतर सुरूच राहणार आहे. कारण त्याबाबत आता जनजागृती झाली आहे, असे स्पष्ट करतानाच स्वेच्छेने होणाऱ्या धर्मांतराला विनाकारण कोणी विरोध करू नये. तसेच आमच्याकडे कोणी वाकड्या नजरेनेही पाहू नये, असा इशारा विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय मंत्री प्रा. व्यंकटेश आबदेव यांनी सोमवारी दिला. धर्मांतरासाठीच्या जागृतीसाठी विहिंप प्रयत्न करतच राहणार, हे सांगण्यासही ते विसरले नाहीत.

सातारा येथे आयोजित संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. पंढरपूर येथील अनिल बडवे प्रमुख पाहुणे होते. बाळ महाराज, नीळकंठ शिवाचार्य महारेश्वर, आचार्य शिवानंद भारती, भार्गवजी सरपोतदार, विनायकराव थोरात आदींची उपस्थिती होती.

प्रा. आबदेव म्हणाले, ‘यापूर्वी ज्यांना जबरदस्तीने धर्म बदलायला लावला ते आता परत मूळ धर्मात येत आहेत. पुन्हा धर्मात घेण्याची संस्कृती अनेक वर्षांची आहे. केवळ राजकारण करण्यासाठी सर्वधर्मसमभाव हा शब्द वापरला जातो. मात्र, ही संकल्पनाच काढून टाकावी लागेल. कारण अनेक मुस्लिम प्रवक्त्यांनी वाहिन्यांवर बोलताना, आपल्याला धर्म बदलण्यास भाग पाडले, असे जाहीरपणे कबूल केले आहे. याचाच अर्थ हे लोक मूळचे हिंदूच होते, मग त्यांना कोणत्याही दबावाशिवाय पुन्हा हिंदू धर्मात आणले तर बिघडले कुठे? असा प्रश्नही आबदेव यांनी उपस्थित केला.
हिंदू धर्मात ज्यांना यायचे होते त्यांना परत आणल्याचा मला अभिमान आहे. आतापर्यंत तीन लाख मुस्लिम आणि चार लाख ख्रिश्चन यांना विहिंपने परत हिंदू धर्मात आणल्याचा दावाही त्यांनी केला. बाबूजी नाटेकर यांनी कायर्क्रमाचे प्रास्ताविक केले.
जगच हिंदूमय : बडवे
बडवे महाराज म्हणाले, सध्या परिवर्तन शुद्धीचे सुरू असलेले काम हे आमच्या संस्काराचा भाग आहे. काही दिवसांपूर्वी आग्रा येथे दोनशे मुस्लिम हिंदू झाले तेव्हा लोकप्रतिनिधींनी संसद बंद पाडली होती. जेव्हा हिंदूंचे मुस्लिम आणि ख्रिश्चन होतात, तेव्हा या मंडळींची वाचा का बसली होती? आमचे राष्ट्र हे हिंदू राष्ट्र आहे आणि केवळ आमचा देश नव्हे, तर जग आम्हाला हिंदू करायचे आहे.’