आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संध्यादेवी कुपेकरांविरोधात स्वाभिमानी, शिवसेनेचा उमेदवार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर- चंदगड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या संध्यादेवी बाबासाहेब कुपेकर यांच्याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शिवसेनेने आपला उमेदवार कायम ठेवला आहे. शनिवार हा माघारीचा शेवटचा दिवस होता. संध्यादेवींविरोधात शिवसेनेने प्रा. सुनील शिंत्रे यांना उमेदवारी दिली असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून राजेंद्र गड्डन्यावर हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. कुपेकरांना o्रद्धांजली म्हणून ही निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन राष्ट्रवादीने केले होते, परंतु 2014 चा अंदाज घेण्यासाठी या दोन्ही संघटनांनी आपले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. 24 फेब्रुवारीला येथे मतदान होणार आहे.