आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विनाकारण मुख्यमंत्री बदल ही संस्कृती नाही : पाटील

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काेल्हापूर - ‘राज्यात मराठा समाजाचे मोर्चे निघत असताना जातीय समीकरणांचा अाधार देत सोशल मीडियावर मुख्यमंत्री बदलाची जोरदार चर्चा सुरू आहे. पण कारण नसताना मुख्यमंत्री बदलणे आमची संस्कृती नाही,’ असा पुनरुच्चार राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी केला.
संभाव्य मुख्यमंत्रिपदासाठी पाटील यांचे नाव अाघाडीवर अाले. याबाबत पत्रकारांनी विचारले असता ‘आपण कोरे पाकीट अाहाेत. मालक कोऱ्या पाकिटावर पत्ता लिहितो आणि त्या ठिकाणी ते पाकीट जाते. मला मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक जरी व्हायला सांगितले तरी मी होईन,’ अशी मिश्कील प्रतिक्रिया पाटील यांनी दिली.
दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत भाजप राज्य सरकार नेहमीच सकारात्मक प्रयत्न करत अाहे. हे अारक्षण देण्यासाठी राज्य सरकार बांधील आहे. अारक्षणाची न्यायालयीन लढाई राज्य सरकार जिंकेल, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला. शिवसेनेने विशेष अधिवेशनाची जी मागणी केली आहे त्याबाबत राज्यपाल आणि मुख्यमंत्री निर्णय घेतील, असेही पाटील यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...