आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sivapratisthan Demanding Change The Name Of Islamapur

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ताजा महाराष्‍ट्र: \'इस्‍लामपूरचे करा ईश्‍वरपूर\', देशातील पहिल्‍या 4G WI-FI शहरात मागणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली - दिल्लीत औरंगजेब रोडचे नाव बदलून माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे नाव देण्‍यात आले. त्‍यानंतर नामांतराचा विषय पेटला. औरंगाबादचे नाव संभाजीनगर करा या मागणीने जोर धरला. तोच आणखी एक नवीन मागणी पुढे आली. ती म्‍हणजे, सांगली जिल्‍ह्यातील इस्‍लामपूरसंदर्भात. इस्‍लामपूर शहराचे नाव बदलून ईश्‍वरपूर करा अशी मागणी सध्‍या जोर धरू लागली आहे.

या नामांतरासाठी संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठानने आंदोलनाचा इशारा दिला आहे. शिवसेनाही या मागणीसाठी आक्रमक झाली आहे. 1986 पासून ही मागणी असल्‍याचे शिवसेनेच्‍या सांगली जिल्‍हाप्रमुखांनी सांगितले आहे. त्‍यामुळे हा वाद चिघळण्‍याची शक्‍यता आहे.

इस्‍लामपूरची ओळख
इस्‍लामपूरमध्‍ये तंत्रज्ञानाच्‍या क्षेत्रात झालेल्‍या उल्‍लेखनिय कामगीरीमुळे या शहराला नवीन ओळख मिळाली आहे. देशातील पहिले 4G वायफाय शहर असा बहुमान या शहराने काही दिवसांपूर्वी पटकावला आहे. मात्र, विकासाऐवजी नामांतराचा वाद उकरून काढल्‍याने काहींनी आश्‍चर्य व्‍यक्‍त केले आहे.
पुढील स्‍लाईडवर वाचा..
पुण्यात शॉर्टसर्कीटमुळे चिमुकलीचा मृत्यू, 5 जखमी, महावितरणवर आरोप
चालत्या मोटारीने घेतला पेट
घरावर दिवसाढवळ्या दरोडा, ८० वर्षीय महिलेचा मृत्यू