कोल्हापूर - अंबाबाईच्या मूर्तीवर तब्बल 22 वर्षांच्या न्यायालयीन लढ्यानंतर रासायनिक संवर्धन प्रक्रियेला बुधवारी विधिवत सुरुवात झाली होती. मात्र, मात्र, ही प्रक्रिया अधार्मिक असल्याचे सांगत हिंदू जनजागृती समितीने याला विरोध केला होता त्यामुळे काम थांबवले गेले होते. पण, काम थांबवण्याचा कुठलाही आदेश नसल्याचे स्पष्ट करत पुरातत्व विभागाचे एक पथक आज (शनिवार) कोल्हापुरात दाखल झाले आहे. त्या अनुषंगाने काम पुन्हा सुरू होणार आहे.
मूर्तीवर वज्रलेप लावण्यास हिंदू जनजागृती संघटनेने विरोध केला होता. त्यामुळे काम थांबवण्यात आले होते. यामुळे कोल्हापूरकरांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. पण, काम थांबवण्याचा कोणताही आदेश दिला नाही आणि थांबलेले काम तातडीने सुरू करण्याचे आदेश पुरातत्व विभागाच्या संचालकांनी दिल्याने आज औरंगाबादहून एक पथक कोन्ल्हापुरात दाखल झाले आहे.