आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासांगली - केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयामार्फत गेल्या सहा वर्षांपासून देशभरातील विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या प्रयोगांची माहिती देत फिरत असलेली सायन्स एक्स्प्रेस रेल्वे यावर्षी भारतातील जैवविविधिता घेऊन विद्यार्थ्यांच्या भेटीला येत आहे. शुक्रवारी ही गाडी सांगली जिल्ह्यातील मिरज येथे चार दिवसांच्या मुक्कामासाठी येत असून 15 सप्टेंबरपासून औरंगाबाद रेल्वेस्थानकावर असेल.
केंद्र शासनाच्या विज्ञान-तंत्रज्ञान विभागातर्फे 2007 पासून ‘सायन्स एक्स्प्रेस’ला सुरवात झाली. आतापर्यंत 98 हजार कि.मी.चा प्रवास करून या गाडीने 1 कोटी विद्यार्थ्यांना विज्ञानाची माहिती दिली आहे. दरवर्षी ही रेल्वेगाडी देशभरातील वेगवेगळ्या प्रांतांत जाऊन विद्यार्थ्यांना नवनवीन प्रयोगांची माहिती करून देते.
यावर्षी ही गाडी विद्यार्थ्यांना भारताची जैवविविधता समजावून सांगणार आहे. 30 जुलैला ही गाडी चेन्नईहून सुटली. केरळ, कर्नाटक, गोवा राज्यातील वेगवेगळ्या शहरांना भेटी देऊन ही गाडी शुक्रवारी महाराष्ट्रात येत असल्याची माहिती रेल्वेच्या पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी वाय. के. सिंग यांनी दिली.
दडलंय काय?
13 डब्यांची ही गाडी हिमालयातील वन्यजीवन, गंगा आणि अन्य नद्यांच्या खोर्यातील जैवविविधता, उत्तर-पूर्व भारत, पश्चिम घाट, वाळवंटातील जैवविविधता, दख्खनचे पठार, किनारपट्टी आणि अंदमान-निकोबार, लक्षद्वीपसारख्या बेटांवरील जैवविविधतेची माहिती देईल. त्याच्याबरोबरीने बदलते तापमान, सुरक्षित पर्यावरण, ऊर्जाबचत, शिक्षकांचे प्रशिक्षण अशी या गाडीची वैशिष्ट्ये आहेत. या गाडीतील सर्व प्रयोगांची माहिती मराठीतूनही देण्यासाठी खास माहितगारांची नेमणूक करण्यात आली आहे.
काही लाइव्ह प्रयोगही
या गाडीतील 11 डबे हे प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले आहेत, तर एका डब्यात प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. या प्रयोगशाळेत विद्यार्थ्यांना काही प्रयोगही करून दाखवले जाणार आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.