आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लहान मुले बोलतात, त्यावर बोलत नाही - पवारांचा चव्हाणांना टाेला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सातारा - लहान मुले काय बोलतात त्यावर मी फारसे बोलत नाही. काँग्रेसच्या अध्यक्षांनी वक्तव्य केले असते तर प्रतिक्रियेचा प्रश्न येतो. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांच्या वक्तव्यावर काय बोलू? असा उपरोधिक सवाल करतानाच विरोधी पक्षनेत्यांनी भाजप, शिवसेनेला सोबत घेऊन नगर बँकेची निवडणूक का लढवली याची माहिती त्यांनी घ्यावी आणि मग बोलावे, असा टोला पवारांनी लगावला.
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर पत्रकारांशी पवार बोलत होते. सर्व काँग्रेस एकत्र येऊ शकतात, या पवारांच्या वक्तव्यावर चव्हाण यांनी राष्ट्रवादीने भाजपशी असलेली जवळीक कमी केल्यास तसे होईल, अशी प्रतिक्रिया दिली होती. त्याचा समाचार घेताना पवार म्हणाले, मला कटूता वाढवायची नाही. पण स्थानिक निवडणुकांत काँग्रेस व भाजप बरोबर राहतात. आपल्या भाऊबंदांची कोणासोबत उठबस आहे हे चव्हाणांनी तपासावे. राज्यसभेत सर्व पक्षांचे नेते काही मुद्द्यांवर एकत्र येतात. चर्चा करतात. काही विरोध, तर काही वेळा एकमत असते. सभागृहात संवाद, चर्चा सुरू असणे याचा अर्थ जवळीक असा होत नाही.

जिल्हा बँकांत काय झाले
नगर : विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी भाजपशी संधान बांधून बाळासाहेब थोरातांची सत्ता पालटवण्याचा डाव रचला होता.
बीड : भाजपच्या पंकजा मुंडे, राष्ट्रवादीचे सुरेश धस, जयदत्त क्षीरसागर यांची युती होती. उस्मानाबाद : भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र आले होते, तर
काँग्रेस व शिवसेना एकत्र होते.