आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्रपट महामंडळाच्या सभेत गोंधळ; दिग्गजांना विरोधकांनी रोखले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बुधवारी झालेल्या द्वैवार्षिक सभेमध्ये प्रचंड गोंधळ उडाला. सत्तारूढ आणि विरोधक यांच्यात धक्काबुक्की, प्रचंड आरडाओरडा, आरोप- प्रत्यारोपांनी शाहू स्मारक सभागृह दणाणून गेले. महामंडळाचे अध्यक्ष अभिनेते विजय पाटकर, अभिनेत्री अलका कुबल आणि माजी अध्यक्ष प्रसाद सुर्वे यांना सभागृहाबाहेर सोडायचे नाही, असा विरोधकांनी चंग बांधल्याने या तिघांनाही बराच वेळ एका खोलीतच बसून राहावे लागले.

गेली काही वर्षे महामंडळाचा कारभार विविध वादग्रस्त कारणांनी गाजतो आहे. यंदाचीही ही सभा गाजणार असल्याची चिन्हे दिसत होती. बुधवारी दुपारी तीन वाजता सभा सुरू झाल्यानंतर ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी, दिग्दर्शक यशवंत भालकर, रणजित जाधव यांच्यासह अन्य सभासदांनी गेल्या वेळचे इतिवृत्त आणि सुर्वे यांच्या काळात झालेला १३ लाखांचा अतिरिक्त खर्च याची वसुली हा मुद्दा उचलून धरला. याबाबत न्यायालयीन वाद सुरू असल्याने आपण ही रक्कम भरू शकत नसल्याचे सुर्वे यांनी जाहीर करताच विरोधकांचा पारा चढला. स्टेजवर एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यापासून ते धक्काबुक्कीचा प्रकार सुरू झाला. अखेर पोलिसांनी दोन्ही गटांना बाजूला काढले. यानंतर विजय पाटकर यांनी एखादा कार्यक्रम आयोजित करून ही भरपाई करण्याची तयारी दाखवली, मात्र त्यालाही विरोध करण्यात आला. अखेर आरडाओरडा सुरू असतानाच पाटकर यांनी सभेच्या विषयपत्रिकेवरील क्रमांकाचा विषय वगळता अन्य सर्व विषय मंजूर झाले असून एप्रिलमध्ये निवडणूक होईल, अशी घोषणा केली. यानंतर आणखी गोंधळ सुरू झाला. पाटकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना बाहेर जाण्यापासून विराेधकांनी राेखले.

काेल्हापुरात बुधवारी झालेल्या चित्रपट महामंडळाच्या बैठकीत वाद झाल्याने सदस्य हमरीतुमरीवर अाले हाेते.
बातम्या आणखी आहेत...