आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अनिकेत कोथळे खून प्रकरण; CCTV फुटेज डिलीट करणारा ताब्यात; कामटेच्या फ्लॅटची झडती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोलिस कोठडीत मृत्यू झालेला अनिकेत कोथळे. - Divya Marathi
पोलिस कोठडीत मृत्यू झालेला अनिकेत कोथळे.

सांगली/कोल्हापूर- अनिकेत कोथळे खूनप्रकरणी शहर पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज डिलीट करण्यात आल्याचे उघड झाले होते. याप्रकरणी 'सीआयडी'ने एकाला ताब्यात घेत त्याची चौकशी केली आहे.

 

 

अनिकेत कोथळे याच्या पोलिस ठाण्यातील मृत्यू आणि त्यानंतरची सर्व घटना पोलिस ठाण्यातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. मात्र संशयित कामटे याने सीसीटीव्हीमधील हे सर्व फुटेज डिलीट करुन सीसीटीव्ही बंद पाडला होता. या खून प्रकरणात सगळ्यात महत्त्वाचे हे पुरावे होते. मात्र ते डिलीट करण्यात आले. याप्रकरणी ज्या व्यक्तीकडून हे सीसीटीव्ही फुटेज डिलीट करण्यात आले. त्या संशयित आरोपीस सीआयडी पथकाने ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली आहे. या चौकशीनंतर सदर संशयितावर अटकेची कारवाई होऊ शकते व तपासात आणखी भक्कम पुरावे सीआयडीच्या हाती लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

 

 

अनिकेत कोथळे खून प्रकरणी बडतर्फ करण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे याच्या फ्लॅटचीही सीआयडीने झाडाझडती घेतली आहे. यावेळी आरोपी कामटे देखील त्यांच्यासोबत होता.

 

 

कामटे याचा विश्रामबाग येथे फ्लॅट आहे. दीड तास सुरू असलेल्या या झडतीच्या वेळी सीआयडीला काय सापडले याची माहिती मिळू शकला नाही. मात्र, गुन्ह्याच्या अनुषंगाने काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्याचे सुत्रांकडून समजते.

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...