Home »Maharashtra »Western Maharashtra »Kolhapur» Clash In Kolhapur Between 2 Groups

काेल्हापुरात मुस्लिम बोर्डिंग निवडणुकीच्या वादातून राडा; घरासह 4 दुचाकींची तोडफोड

येथील मुस्लिम बोर्डींग निवडणुकीच्या वादातून 30 ते 40 जणांच्या जमावाने रविवार पेठेतील महात गल्ली येथील शौकत बागवान यांच्य

दिव्य मराठी वेब टीम | Sep 27, 2017, 23:58 PM IST

  • जाळण्यात आलेल्या दुचाकी.
कोल्हापूर- कोल्हापुरातील शहरातील मुस्लिम बोर्डिंग निवडणुकीच्या वादातून बुधवारी ३० ते ४० जणांच्या जमावाने रविवार पेठेतील महात गल्लीत राहणारे शौकत बागवान यांच्या घरावर सशस्त्र हल्ला चढवला. तसेच अन्य चार वाहनांची तोडफोड केली. हल्लेखोरांनी तरुण मंडळाचे कार्यालय पेटवण्याचाही प्रयत्न केला. या घटनेमुळे बिंदू चौक परिसरात तणावाचे वातावरण होते. पाेलिसांनी तातडीने धाव घेऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.

शहरातील ऐतिहासिक मुस्लिम बोर्डिंगची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत चेअरमन गनी आजरेकर यांच्या पॅनलचा शौकत इक्बाल बागवान यांनी प्रचार केला होता. त्याचा राग मनात धरून बुधवारी दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास ३० ते ४० हल्लेखोर तोंडाला कापड बांधून बागवान यांच्या घराजवळ अाले. त्यांनी घरावर बाहेरून दगडफेक केली. दारात उभी करण्यात आलेल्या बुलेटवर पेट्रोल टाकून ती पेटवली. अन्य चार मोटारसायकलींची तोडफोड केली. यानंतर हल्लेखोर बागवान यांच्या घरात शिरले. त्यांनी तेथील साहित्य विस्कटले. महिलांना चाकूचा धाक दाखवला.त्यांच्या गळ्यातील दागिने हिसकावण्याचा प्रयत्न केला. यानंतर हल्लेखोरांनी येथील “तडाका’ तरुण मंडळाचे कार्यालय पेटवण्याचा प्रयत्न केला. तेथे असणाऱ्या टेम्पो-रिक्षाची तोडफोड केली.

या घटनेची माहिती मिळताच लक्ष्मीपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. स्थिती तणावपूर्ण बनल्याने या ठिकाणी राज्य राखीव दलाची तुकडी पाचारण करण्यात आली. लक्ष्मीपुरी पोलिसात हल्लेखाेरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . दरम्यान, कोल्हापूर आणि परिसरातील नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले.
पुढील स्लाईडवर पाहा फोटो आणि माहिती

Next Article

Recommended