आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोल्हापुरातील टोलप्रश्नाचा तिढा सुटणार, मुख्यमंत्र्यासोबत सकारात्मक चर्चा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (शनिवार) कोल्हापूरातील टोलमुक्तीच्या दिशेने सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. कोल्हापुरात प्रथमच टोलविरोधी कृती समिती आणि सरकारमध्ये समोरासमोर सकारात्मक चर्चा झाली. बैठकीत झालेल्या सकारात्मक चर्चेमुळे मागील पाच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कोल्हापुरातील टोलप्रश्नाचा तिढा सुटण्याची आशा पल्लवीत झाली आहे.

बैठकीत सुरवातीला कोल्हापुरातल्या रस्त्यांचे मूल्यांकन होऊ द्या, त्यानंतरच टोलमुक्तीच्या निर्णयाबाबत विचार करू असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले, त्यामुळे काही काळ टोलविरोधी कृती समितीच्या सदस्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती. त्यानंतर मात्र मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरकरांना म्हणजेच एमएच 09 पासिंग गाड्यांना पासेस द्यायची तयारी त्यांनी दर्शवली. मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेवर टोलविरोधी कृती समितीने समाधानी व्यक्त केल्याची माहिती टोलविरोधी कृती समितीचे नेते प्रा.एन.डी. पाटील यांनी दिली आहे..