आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • CM Fadnavis Surname Wrong In Natya Sammelan Invitation Card

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाट्यसंमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेत मुख्यमंत्र्यांच्या आडनावात चूक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - बेळगा वयेथे फेब्रुवारीपासून सुरु होत असलेल्या ९५ व्या नाट्य संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेत आता मुख्यमंत्र्यांचेच आडनाव चुकीचे छापण्यात आले आहे. विविध कारणांमुळे वादात सापडलेले हे संमेलन त्यामुळे पुन्हा चर्चेत आले आहे. मुख्यमंत्र्यांचे नाव तरी अचूक छापायला हवे होते, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आडनाव ‘फडवणीस’ असे छापण्यात आले आहे. पत्रिकेच्या दुसर्‍या पानावर ही गंभीर चूक झाली आहे. मुख्यमंत्री ही चूक कदाचित गांभीर्याने घेणारही नाहीत. गडबडीत अशा चुका होतात हे मान्यही करतील. मात्र संयोजकांनी याबाबत अधिक लक्ष देण्याची गरज होती. नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाचे सदस्य प्रफुल्ल महाजन यांच्याशी संपर्क साधून त्यांना ही चूक दाखवून दिली असता त्यांनी अध्यक्ष मोहन जोशी यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा जोशी यांनी अशी चूक झाल्याचे कबूल केले. मात्र पत्रिका छापून झाल्या असल्याने आता त्यात बदल करणे शक्य नाही, असे त्यांनी महाजन यांना सांगितले.