आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘कोल्हापुरी शिवी’ देणारे पानसरेंचे मारेकरी स्थानिकच, पाेलिसांना संशय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - ज्येष्ठ भाकप नेते काॅ. गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील धागेदाेरे उलगडवण्यात पाेलिसांना काहीसे यश येत अाहे. पानसरेंवर गाेळ्या घालताना हल्लेखोरांनी अस्सल कोल्हापुरी शिवी दिल्याने हे मारेकरी स्थानिकच असावेत, असा दाट संशय पोलिस खात्यातील वरिष्ठांनी व्यक्त केला आहे. दुसरीकडे पोलिसांची दिशाभूल करण्यासाठीही ही शिवी दिली असावी, असाही कयास लावला आहे.
१६ फेब्रुवारीला पानसरेंवर गोळीबार झाला. त्यानंतर मिळालेल्या सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या अाधशरे दाेन संशयितांची रेखाचित्रे पोलिसांनी जारी केली आहेत. हे चित्रीकरण आणि प्रत्यक्षदर्शीकडून मिळालेल्या माहितीनुसार हल्लेखोर या परिसरात दोन तास होते, तसेच ते पाच जण असावेत, हल्ला पाठीमागून झाला असावा, असे काही निष्कर्ष काढला जात अाहे. हल्लेखोरांनी गाेळ्या झाडण्यापूर्वी अस्सल कोल्हापुरी भाषेत शिवी दिल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे हल्लेखोर स्थानिकच असावेत यादृष्टीनेही पोलिसांनी तपास केंद्रित केला आहे.
दरम्यान, मारेकऱ्यांचे ठाेस धागेदाेरे अाम्हाला मिळाले असून लवकरच अाराेपी पकडले जातील, असे जिल्हा पाेलीस अधीक्षक मनाेजकुमार शर्मा यांनी सांगितले.