आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Mla Jaykumar Gore Arrest In Kidnap Case In Satara

निवडणूक अधिकार्‍याचे अपहरण : काँग्रेसचे आमदार गोरे अटकेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सातारा - माण (जि. सातारा) येथील काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे व अभिजित काळे यांना गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने रविवारी अटक केली. आंधळी विकास सेवा सोसायटीच्या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकार्‍याचे अपहरण केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. ही निवडणूक मार्च महिन्यात झाली होती. त्या वेळी एस. एस. तायडे यांचे अपहरण करण्यात आले होते.

दोन दिवसांनी त्यांना सोडण्यात आले.याबाबत तायडे यांनी अमरावती पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यावरून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, गोरे व काळे यांनी प्रकृती बिघडल्याची तक्रार केल्यानंतर त्यांना ‘आयसीयू’त दाखल करण्यात आले, तर आणखी एक आरोपी प्रताप भोसले फरार आहे.