आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Congress Nationalist Congress Should Keep Asid Religious Power, CM Said

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी न पाळल्यास धर्मांधांचा धोका; मुख्‍यमंत्र्यांना भीती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा - ‘काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडीचा धर्म पाळला पाहिजे. असे झाले नाही तर धर्मांध शक्ती डोके वर काढू शकतात,’ अशी भीती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी व्यक्त केली.

रहिमतपूर येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले की, डॉ. दाभोलकर यांच्या हत्येने धर्मांध शक्ती पुन्हा डोके वर काढत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. या शक्तींना तोंड देण्यासाठी आघाडीने सर्व शक्तीनिशी एकजूट व्हायला हवे, अन्यथा सांगली महापालिकेसारखी स्थिती ओढवू शकते, असा टोलाही त्यांनी राष्ट्रवादीला लगावला. शिवसेना-भाजप हेच पक्ष काँग्रेसचे विरोधक असून राष्ट्रवादी हा मित्रपक्ष असल्याचे सांगण्यासही ते विसरले नाहीत.

आगामी निवडणुकांसाठी मित्रपक्षांशी जे ठरले आहे तसाच जागावाटपाचा आकृतिबंध राहील. त्यातून जे बदल असतील, त्यासाठी पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर विचारविनिमय होईल. कार्यकर्त्यांनी पक्षर्शेष्ठींच्या मताचा आदर ठेवून प्रामाणिकपणे काम करून आघाडीला यश मिळवून द्यावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.


आपली भांडणे थांबवा अन्यथा पुन्हा युतीची सत्ता : पतंगराव कदम
राज्यात पुन्हा आघाडीचीच सत्ता यावी, यासाठी दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी शहाणपणाने आणि एकदिलाने काम करण्याची गरज आहे. आपणच एकमेकांच्या पायात पाय घालत बसलो तर पुन्हा युतीची सत्ता येईल, अशी भीती वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी रविवारी व्यक्त केली. वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील यांच्या एकसष्ठीनिमित्त आयोजित सोहळय़ात ते बोलत होते. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते पाटील यांचा 61 लाख रुपयांचा धनादेश देवून सत्कार करण्यात आला.