आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापुरात पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादीच!, भाजप-ताराराणी अाघाडीचे स्वप्न भंगले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - काेल्हापूर महापालिका निवडणुकीत एकाही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसल्याने त्रिशंकू अवस्था निर्माण झाली अाहे. मात्र, काँग्रेस व राष्ट्रवादीचे संख्याबळ बहुमतापर्यंत जाणारे असल्याने हे दाेघेही पूर्वाश्रमीचे मित्रपक्ष पुन्हा एकत्र येऊन सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याचे जवळपास निश्चित झाले अाहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशाेक चव्हाण व राष्ट्रवादीचे स्थानिक नेते हसन मुश्रीफ यांनीही त्यास दुजाेरा दिला. दुसरीकडे, भाजप आणि ताराराणी आघाडीने संयुक्तरीत्या ३२ जागा मिळत सर्वात माेठ्या पक्षाचा मान मिळवला असला तरी सत्तास्थापनेचे स्वप्न मात्र त्यांना पूर्ण करता येणार नाही.

काेल्हापूर महापालिकेच्या ८१ जागांसाठी रविवारी मतदान झाले. साेमवारी मतमाेजणी हाेऊन निकाल जाहीर झाले. त्यात अाघाडीला मिळालेल्या ३२ पैकी १९ जागा ताराराणी पॅनलने, तर १३ जागा भाजपने मिळवल्या. त्याखालोखाल २७ जागा काँग्रेसला मिळाल्या, तर राष्ट्रवादीची १५ ठिकाणी सरशी झाली. शिवसेनेने मात्र वातावरण तयार केले असले तरी त्यांना गेल्या वेळच्या म्हणजेच ४ जागांवर समाधान मानावे लागले.

सुरुवातीपासूनच दोन्ही काँग्रेस आघाडीवर राहतील, असा अंदाज वर्तवला जात हाेता. मात्र, भाजप आणि ताराराणी आघाडीनेही शेवटच्या टप्प्यात जोर लावला होता. ताराराणी, भाजपच्या जागाही सर्वाधिक आल्या. मात्र, त्यांना ४१ हा बहुमताचा आकडा गाठता आला नाही. त्यामुळेच पूर्ण शक्ती पणाला लावूनही या ठिकाणी भाजप ताराराणीला सत्तेपासून बाहेर राहावे लागले. दोन्ही काँग्रेसच्या जागा या वेळी घटल्या, तर भाजपच्या जागा तीनवरून १३ वर गेल्या आहेत. गेल्या वेळी जनसुराज्यचे उमेदवार राष्ट्रवादीसोबत होते व यंदाही जनसुराज्य राष्ट्रवादीसोबतच आहे. मात्र, त्यांचे चिन्ह घेता आलेले नाही.

मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच भाजपला पराभवाचा धक्का, पुढील स्लाइडवर
बातम्या आणखी आहेत...