आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्‍हापुरात काँग्रेसच्‍या 'हाता'वर 'घडाळा'ची टीकटीक, आघाडीवर शिक्कामोर्तब

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - येथील महापालिकेमध्ये आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत सत्ता स्थापण्‍याचा निर्णय घेतला असून, काँग्रेसकडे महापौर तर राष्‍ट्रवादीकडे उपमहापौरपद असणार आहे. काँग्रेसचे ज्‍येष्‍ठ नेते पतंगराव कदम, राष्‍ट्रवादीचे हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्‍थ‍ित झालेल्‍या बैठकीत हा निर्णय घेण्‍यात आला. या दोन्‍ही पक्षांनी स्‍वबळावर ही निवडणूक लढवली होती.

कुणाच पक्षाला नाही बहुमत
कोल्हापूर महापालिका निवडणुकीत एकाही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसल्याने त्रिशंकू अवस्था निर्माण झाली. मात्र, काँग्रेस राष्ट्रवादीचे संख्याबळ बहुमतापर्यंत जाणारे असल्याने हे दोघेही पूर्वाश्रमीचे मित्रपक्ष पुन्हा एकत्र येऊन सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत.
असे आहे पक्षीय बलाबल
कोल्हापूर महापालिकेच्या ८१ जागांसाठी रविवारी मतदान झाले. सोमवारी मतमोजणी होऊन निकाल जाहीर झाले. त्यात आघाडीला मिळालेल्या ३२ पैकी १९ जागा ताराराणी पॅनलने, तर १३ जागा भाजपने मिळवल्या. त्या खालोखाल २७ जागा काँग्रेसला मिळाल्या, तर राष्ट्रवादीची १५ ठिकाणी सरशी झाली. शिवसेनेने मात्र वातावरण तयार केले असले तरी त्यांना गेल्या वेळच्या म्हणजेच जागांवर समाधान मानावे लागले.


बातम्या आणखी आहेत...