आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress President Manikrao Thackeray Advice To Nationalist Congress Party

आत्मक्लेश तर झाला, आता आत्मचिंतन करा !, माणिकराव ठाकरे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर- अजित पवार यांनी आत्मक्लेश करून घेतला आहे; परंतु विदर्भामध्ये शिवसेना भाजपला बरोबर घेऊन काही ठिकाणी सत्तेत बसलेल्या राष्‍ट्रवादी कॉँग्रेसला आत्‍मचिंत करण्याची गरज आहे, असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी मंगळवारी लगावला.

कोल्हापुरातील मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी त्यांनी शिवसेना, भाजप आणि मनसेचाही समाचार घेतला. ठाकरे यांचा काँग्रेस जिल्हाध्यक्ष माजी आमदार पी. एन. पाटील आणि खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ‘भाजप राष्‍ट्रीय स्वयंसेवक संघाच्याच ताब्यात आहे. त्यामुळेच मूळचे संघाचे असलेले नितीन गडकरी भाजपचे राष्‍ट्रीय अध्यक्ष झाले आणि संघाचेच देवेंद्र फडणवीस आता प्रदेशाध्यक्ष झाल्याचे माणिकराव म्हणाले. शिवसेना आणि मनसे या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. राष्‍ट्रवादीनेही आत्मचिंतन न केल्यास आघाडीतील मतभेद वाढत जातील व महाराष्‍ट्रातील जनता आपल्याला कधीच माफ करणार नाही, असेही ते म्हणाले.

मंत्री गावित चुकलेच
विद्यार्थ्यांशी बोलताना मंत्री गावित चुकलेच, अशा शब्दात ठाकरे यांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल नापसंती व्यक्त केली. प्रत्येक नेत्याने जबाबदारीने बोलण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.