आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजू शेट्टी आणि अशोकराव चव्हाण यांच्या गळाभेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला ऊत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर- काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी आज (शनिवार) सकाळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय क्षेत्रातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

 

उभय नेत्यांमध्ये शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देऊन शेतकऱ्याचा सातबारा कोरा करण्याच्या तसेच विविध प्रश्नांवर लोकसभेत एकत्र आवाज उठवण्याबाबत चर्चा झाल्याचे समजते. याभेटीदरम्यान राजू शेट्टी आणि अशोकराव चव्हाण यांनी गळाभेट घेतल्याने तर्कवितर्क लढवले जात आहे.

 

अशोक चव्हाण यांचा कोल्हापूर दौरा म्हणजे 2019 च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेली चाचपणी असल्याचे बोलले जात आहे.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा संबंधित घटनेचे फोटो.....

बातम्या आणखी आहेत...