आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर विद्यापीठाचा सातवा दीक्षांत सोहळा थाटात

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सोलापूर विद्यापीठाचा सातवा दीक्षांत सोहळा शुक्रवारी थाटात पार पडला. या समारंभात प्रमुख अतिथी म्‍हणून केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू डॉ. बाबासाहेब बंडगर होते.

विद्यापीठाच्‍या प्रांगणात सकाळी 10.30 वाजता दीक्षांत मिरवणुकीने समारंभास प्रारंभ झाला. दीक्षांत मिरवणुकीमध्‍ये सुशीलकुमार शिंदे, डॉ. बंडगर यांच्‍यासह ज्ञानदंड हाती घेतलेले परीक्षा नियंत्रक डॉ. दादासाहेब साळुंखे, कुलसचिव कॅप्‍टन डॉ. नितीन सोनजे, विद्यापरिषदेचे सदस्‍य, व्‍यवस्‍थापन परिषदेचे सदस्‍य, विद्याशाखांचे अधिष्‍ठाता व विद्याशाखानिहाय स्‍नातकांचा समावेश होता.

या कार्यक्रमात पाच हजार 239 जणांना पदवी तर 35 जणांना पीएच.डी प्रदान करण्‍यात आली. अव्‍वल क्रमांक पटकाविलेल्‍या सहा गुणवंतांना सुवर्णपदकाने सन्‍मानित करण्‍यात आले. (छायाचित्रे- अप्‍पु शिमगे)