आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crime Against Four Priest Along With 7 People In Case Of Trupti Desai

चार पुजाऱ्यांसह ७ जणांविरोधात गुन्हा, तृप्ती देसाई यांना मारहाण केल्याचे प्रकरण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांना महालक्ष्मी मंदिरात मारहाण केल्याप्रकरणी चार पुजाऱ्यांसह ७ जणांविरोधात राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे देसाई यांच्या तक्रारीऐवजी पोलिस उपनिरीक्षक अमित मस्के यांची तक्रार दाखल करून घेऊन ही कारवाई करण्यात आली आहे.

१३ एप्रिल रोजी देसाई यांना पोलिस बंदोबस्तात महालक्ष्मीच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी नेण्यात आले होते. या वेळी त्यांना अडवण्यासाठी पुजारी आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी जोरदार प्रयत्न केले होते. तरीही पोलिसांच्या सहकार्याने देसाई यांनी गाभाऱ्यातून चुडीदार ड्रेस परिधान करून दर्शन घेतले. दर्शन घेऊन परतत असताना त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. त्यांच्यावर हळद-कुंकू, शाई फेकण्यात आली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हे प्रकरण प्रशासनाने गांभीर्याने घेऊन या प्रकरणी चौकशी सुरू केली होती. यासंबंधीचे चित्रीकरण पाहून ७ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

पुढे वाचा... सांगलीत अदखलपात्र गुन्हा