आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉम्ब बनवून घेत पोलिसांनीच केला टोळीचा पर्दाफाश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - काही युवक पैशाच्या आमिषाने बॉम्ब बनवून देत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनीच पैसे देऊन हे बॉम्ब बनवून घेत युवकांना रंगेहाथ पकडले. या युवकांची 14 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. पोलिसांनी 6 एप्रिल रोजी या चौघांनी अटक केली होती.
अजिंक्य भोपळे, अनिकेत गवळी, नीलेश पाटील, अनिल खसरे अशी चौघांची नावे आहेत. यातील एक इलेक्ट्रॉनिक डिप्लोमाचे शिक्षण घेत आहे, तर दुसरा वायरमनचे काम करत होता. मित्राला मदत म्हणून इतर दोघेही यात सामील झाले होते. या चौघांकडे कसून चौकशी केली असता केवळ पैशाच्या आमिषापोटी त्यांनी हे केल्याचे सांगितले. पोलिसांना याबाबत माहिती मिळाली, तेव्हा खरेच हे युवक बॉम्ब तयार करू शकतात का, याची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनीच या युवकांना पैसे दिले आणि चार बॉम्बची ऑर्डर दिली. ऑर्डरप्रमाणे या युवकांनी बॉम्ब तयार केले आणि पोलिसही चक्रावून गेले. हे बॉम्ब देशविघातक शक्तींच्या हातात पडले असते, तर भविष्यात अनर्थ घडू शकला असता; पण पोलिसांच्या समयसूचकतेमुळे त्याला आळा घातला गेला.