आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘उपरा’कार मानेंवर अत्याचाराचा गुन्हा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा - शिक्षण संस्थेतील महिला कर्मचा-याच्या लैंगिक छळप्रकरणी ‘उपरा’कार पद्मश्री लक्ष्मण माने यांच्याविरुद्ध सोमवारी पोलिसांत अत्याचाराचा गुन्हा नोंदवण्यात आला. दरम्यान, मानेंविरुद्ध पुणे व साता-यातील दोन महिलांनीही लैंगिक छळाच्या तक्रारी दिल्या आहेत. माने सध्या येथे नसल्याने त्यांच्यावर कारवाई झाली नसल्याचे पोलिस म्हणाले.
माने यांच्या शारदाबाई पवार शाळेत ही महिला कामावर आहे. 2003 पासून माने आपला लैंगिक छळ करत आहेत. आपल्या तसेच जावयाच्या घरी वारंवार बोलावून शोषण केले जात असल्याचे पीडितेने म्हटले आहे.