आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्ल्सच्या संचालकांवर गुन्हे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सातारा - एमपीआयडी कायद्यानुसार पर्ल्सच्या गुंतवणूकदारांची ज्या संचालकांनी फसवणूक केली त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार असल्याचे आश्वासन पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिले आहे.

याप्रकरणी अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यासाचे जिल्हाध्यक्ष संदीप जगताप यांनी उपोषण सुरू केले होते. पर्ल्स कंपनीने अनेकांना गंडा घातला आहे. कंपनीकडून फसवणूक झालेल्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे कंपनीच्या संचालकांना अटक करावी, या मागणीसाठी जगताप यांनी उपोषण सुरू केले होते. मात्र, पोलिस अधीक्षकांनी याबाबत कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर जगताप यांनी उपोषण मागे घेतले.