आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सातार्‍यात नवदांपत्याला पूर्ववैमनस्यातून मारहाण; फरार आरोपी जेरबंद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा- कुळकजाई (ता. माण) येथील नवदांपत्य वैभव घाडगे आणि त्यांच्या पत्नीस मारहाण करून खुनाचा प्रयत्न करणारा फरार संशयित योगेश बाजीराव मदने याला पाच महिन्यांनंतर अटक करण्यात सातारा पोलिसांना यश आले आहे. वाई तालुक्यातील जोशी विहीर येथील घाटात पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.

वैभव आणि सौ. वैशाली लग्नानंतर सीतामाईच्या डोंगरावर दर्शनासाठी गेले होत. यावेळी योगेशने त्यांना मारहाण करून दरीत ढकलून दिले होते. एका मारहाणीच्या घटनेत वैभवने त्याच्याविरोधात साक्ष दिल्याच्या रागातून त्याने हे कृत्य केले होते. या घटनेत जखमी झालेले घाडगे दांपत्य सुदैवाने बचावले होते. हे प्रकरण राज्यभर गाजले, राजकीय आरोप- प्रत्यारोपही झाले. योग्य तपास होत नसल्याचा ठपका ठेऊन दहीवडचे पोलिस निरीक्षक गौड यांना निलंबितही करण्यात आले होते. अल्पसंख्यांक आयोगाच्या सदस्यांनीही सातार्‍यात येऊन प्रकरणाची चौकशी केली होती.