आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नरेंद्र दाभोलकरांचे रक्षा विसर्जन शेतात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा- अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा रक्षा विसर्जन विधी कोणत्याही औपचारिक, धार्मिक, कर्मकांडाच्या चौकटीत न करता, एका शेतात त्याचे विसर्जन करण्यात आले. अनिष्ट रूढी, परंपराविरोधात आयुष्यभर लढलेल्या डॉ. दाभोलकर यांचे अंत्यसंस्कार मुलगा हमीद आणि मुलगी मुक्ता या दोघांनीही केले होते. त्यानंतर गुरुवारी रक्षा विसर्जन जकातवाडी येथील शेतीत करण्यात आले.

दाभोलकर कुटुंबीयांनी जकातवाडी येथे शेती प्रयोग परिवार स्थापन केला आहे. या ठिकाणी अनेक कृषी प्रयोग होतात. दाभोलकरांच्या पत्नी डॉ. शैला आणि मुकुंद दाभोलकर हे या परिवाराच्या शेतीचे कर्तेधर्ते आहेत. फावल्यावेळात नरेंद्र दाभोलकरही या ठिकाणी यायचे. गुरुवारी सकाळी डॉ. प्रसन्न दाभोलकर यांच्यासह अंनिसचे उदय चव्हाण, राजेंद्र चोरगे, डॉ.अविनाश पोळ आणि काही कार्यकर्त्यांनी प्रयोग परिवाराच्या शेतात रक्षा पसरली. ज्या मातीतून डॉक्टरांना चैतन्य मिळाले, त्याच मातीत ते एकरूप झाले आहेत, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, सातारा पालिका दाभोलकरांचा जन्म दिवस अंद्धश्रद्धा निर्मूलन आणि व्यसनमुक्ती दिन म्हणून साजरा करणार आहे. जादूटोणा विरोधी कायद्याला दाभोलकरांचे नाव द्यावे, अशी मागणीही सरकारकडे करणार असल्याचे उपनगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी सांगितले.