आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Daily Prasad Will Be Given To Devotees In Kolhapur

कोल्हापुरात भाविकांना मिळणार दररोज प्रसाद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर- कोल्हापुरात येणा-या भाविकांसाठी आता रोज अन्नछत्र सुविधा उपलब्ध होणार आहे. महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टने आठवड्यातील चार दिवस असलेली ही सुविधा आता रोज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती महालक्ष्मी भक्त मंडळाचे अध्यक्ष एस. के. कुलकर्णी व अन्नछत्र ट्रस्टचे अध्यक्ष राजू मेवेकरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

परगावहून महालक्ष्मीच्या दर्शनासाठी येणा-या भाविकांच्या सोयीसाठी 2008 मध्ये अन्नछत्र सुरू करण्यात आले. प्रारंभी फक्त पौर्णिमेदिवशीच अन्नछत्र सुरू केले. भाविकांचा चांगला प्रतिसाद पाहून नंतर आठवड्यातून चार दिवस ही सोय करण्यात आली. परंतु भाविकांची वाढती गरज आणि गर्दी लक्षात घेऊन आता आठवडाभर हे अन्नछत्र सुरू करण्यात येणार आहे.
महालक्ष्मी धर्मशाळेच्या हॉलमध्ये 2008 पासून अन्नछत्र सुरू होते. परंतु तेथील जागा अपुरी पडत असल्याने मंदिराच्या मुखदर्शनाच्या पुढे ताराबाई रोडवरील कपिलतीर्थ मंडईच्या वरील सभागृहामध्ये आता ही सोय करण्यात आली आहे. एकाच वेळी 200 भाविकांची येथे जेवणाची सोय असून सोमवारी दुपारी 4 वाजता तिरूमला तिरूपती देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी एल. व्ही. सुब्रमण्यम यांच्या हस्ते या विस्तारित अन्नछत्राचे उद्घाटन करण्यात येणार आहे.


भाविकांचेही सहकार्य
भाविकांनी महालक्ष्मी मंदिराजवळच सात्त्विक भोजन देण्याच्या अन्नछत्र ट्रस्टच्या या उपक्रमाला कोल्हापुरातील दानशूरांनी जशी मदत केली आहे तशीच मदत भाविकही मोठ्या संख्येने करत आहेत. सर्व परिवार जेवल्यानंतर तेथील दानपेटीत हे अन्नछत्र पुढे सुरू राहण्यासाठी मदत टाकणा-या भाविकांची संख्याही मोठी आहे.