आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dhanagar People Rally For Ban On Sambhaji Brigade

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संभाजी ब्रिगेडवर बंदी घाला : धनगर महासंघ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली - संभाजी ब्रिगेडवर शासनाने बंदी घालावी, या मागणीसाठी सोमवारी धनगर महासंघाने सांगलीतील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. अहिल्यादेवी होळकर यांच्याविषयी फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर लिहिणा-या दिगंबर काळे याच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.
धनगर महासंघाचे नेते माजी मंत्री अण्णा डांगे यांच्या नेतृत्वाखाली दुपारी भर पावसात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शिव प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे, बापू बिरू वाडेगावकर, अ‍ॅड. चिमण डांगे सहभागी झाले होते. या वेळी जिल्हाधिका-यांना दिलेल्या निवेदनात धनगर महासंघाने संभाजी ब्रिगेडवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. रायगडावरील वाघ्या कुत्र्याचे स्मारक कोणत्या कारणाने उद्ध्वस्त केले, हे आम्हाला माहीत नाही. मात्र भय्या पाटील ऊर्फ दिगंबर काळे याने फेसबुकवर मानव पाटील या खोट्या नावाने अहिल्यादेवी होळकर यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण केले आहे. याची गंभीर दखल राज्याच्या गृहमंत्र्यांनी घेणे अपेक्षित होते. पण तसे तर झाले नाहीच, शिवाय दिगंबर काळे याच्यावर गुन्हाही दाखल झाला नाही.
हा समस्त धनगर समाजाचा अपमान आहे. महाराष्ट्राचे सामाजिक ऐक्य बिघडवणा-या संभाजी ब्रिगेडवर बंदी घालावी आणि दिगंबर काळेवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी या वेळी जिल्हाधिका-यांना करण्यात आली.