आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dhobale Leave Pawar After Resignation Of Minister

मंत्रिपद जाताच ढोबळेंनी सोडली पवारांची साथ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली - केंद्रीय कृषिमंत्री व राष्‍ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत मंगळवारी सांगली जिल्ह्याच्या दौ-यावर असलेले पाणीपुरवठा मंत्री लक्ष्मण ढोबळे यांना पदावरून डच्चू दिल्याची खबर मिळताच त्यांनी पवारांसोबतचा दौरा अर्ध्यातच सोडून आपला मार्ग धरला.


राष्‍ट्रवादी कॉँग्रेसने मंगळवारी आपल्या पक्षाच्या सहा विद्यमान मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळून त्यांच्या जागी नव्या चेह-यांना संधी दिली. मात्र, चार दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी सर्वच मंत्र्यांचे राजीनामे घेतल्याने शपथविधी समारंभ होईपर्यंत कोणाला वगळणार हे निश्चित नव्हते. दरम्यान, सकाळी मुंबईत शपथविधीचा कार्यक्रम सुरू असताना शरद पवार मात्र सांगली जिल्ह्याच्या दौ-यावर होते. त्यांच्यासोबत ढोबळेही होते. जत तालुक्यातील शेगाव येथे चारा छावणीची पाहणी केल्यानंतर तेथे पवारांची सभा झाली, या वेळीही ढोबळे पवारांशेजारी व्यासपीठावर उपस्थित होते. मात्र, याच कार्यक्रमात त्यांना मंत्रिमंडळातून वगळल्याचा फोन आला व ढोबळेंनी पवारांसोबत पुढील दौ-यावर न जाता शेगावातूनच परतीचा मार्ग धरला. पुढील कार्यक्रमात त्यांच्या अनुपस्थितीची सर्वत्र चर्चा होती.