आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Digvijay Singh News In Marathi, Congress, Divya Marathi

'अच्छे दिन'ने महागाई लादली, काँग्रेसचे नेते दिग्वजियसिंह यांची मोदी सरकारवर टीका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - देशात विकासाच्या अफवा पसरवून ‘अच्छे दनि’च्या नावाखाली मोदी सरकारने ६० दविसांत केवळ महागाईच दिली, अशा शब्दात काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस दिग्वजियसिंह यांनी बुधवारी भाजपवर टीका केली.राजीव गांधी यांच्या जयंतीदिन आयोजित सद‌्भावना दौड कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार महादेवराव महाडिक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

धर्माधर्मांमध्ये भांडणे लावून राजकारण करण्याचा धंदा भाजपने सत्तेवर आल्यानंतरही सुरू ठेवला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेच्या भावना भडकावण्याचा उद्योग अजूनही सुरू आहे. भारतीय राज्यघटनेला विरोध, बँकांच्या राष्ट्रीयीकरणाला, शेतक-याच्या विकासाला भाजपचा विरोध आहे. काँग्रेसने मंजूर करण्यात आलेल्या आणि पूर्णत्वास नेलेल्या प्रकल्पांची उदघाटने मोदी करत आहेत, अशीही टीका त्यांनी केली. काँग्रेस- राष्ट्रवादीची आघाडी भक्कम असल्याचे ते म्हणाले.

अभेद्द आघाडी, हिताची आघाडी
राज्यात गेली 15 वर्षे काम करताना दोन्ही कॉंग्रेसमध्ये काही मतभेदाचे प्रसंग घडले. परंतु ते तात्पुरत्या स्वरूपाचे होते. येत्या विधानसभेला आघाडी होणार, ती अभेद्य राहणार आणि तेच हिताचे असल्याचेही यावेळी दिग्वजियसिंह म्हणाले.

शरद पवारांचे कौतुक
नविडणूक डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादीचे वर्चस्व असलेल्या या परिसरामध्ये आल्यानंतर दिग्वजियसिंह यांनी शरद पवार यांचे कौतुक केले. ‘शरद पवार हे ध्येयवेडे आहेत. कॅन्सर झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना काही दिवसांचे सोबती असल्याचे सांगितले. मात्र, प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर मी रोगावर मात करीन, असे पवार यांनी सांगितल्याची आठवण या वेळी सिंह यांनी बोलून दाखवली.