आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माउलींच्या उभ्या रिंगणाने डोळ्याचे पारणे फेडले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सातारा - लोणंद (जि. सातारा) येथील दोन दिवसांच्या मुक्कामानंतर संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माउलींची पालखी रविवारी दुपारी तरडगाव येथे मुक्कामी पोहोचली. तत्पूर्वी सायंकाळच्या दरम्यान चांदोबाचा लिंब येथे पालखी सोहळ्याचे पहिले उभे रिंगण पार पडले. या वेळी ‘ग्यानबा- तुकाराम’च्या जयघोषात हजारो वारकरी व भाविकांनी उत्स्फूर्तपणे डोळ्याचे पारणे फेडणार्‍या या सोहळ्याचा आनंद लुटला.

माउलींच्या पालखीचा मुक्काम रविवारी तरडगावला होता.या मुक्कामाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. माउलींचे पहिले उभे रिंगण चांदोबाचा लिंब येथे झाले. माउलींचा अश्व वारकर्‍यांच्या मेळ्यातून भरधाव वेगाने माउलींच्या पालखीला प्रदक्षिणा करतो, तेव्हा उपस्थित हजारो भाविकांच्या मुखातून होणार्‍या हरिनामाचा गजराने परिसर दुमदुमुन गेला होता. उपस्थित भाविकांनी या अश्वाच्या पायाखालची धूळ मस्तकी लावण्यासाठी एकच गर्दी केली होती. सोमवारी पालखी सोहळा फलटणकडे रवाना होणार आहे. या ठिकाणी दोन दिवस मुक्काम असेल. त्यामुळे फलटण येथील विमानतळाचा परिसर आतापासून गजबजला आहे.

(फोटो - रिंगण सोहळय़ात फुगडी खेळण्यात दंग झालेल्या महिला वारकरी. )