आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Double Kesari Winner Ganpatrao Khedkar Passes Away

डबल महाराष्ट्र केसरी खेडकर यांचे निधन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली - दोनवेळा महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावणारे ज्येष्ठ मल्ल गणपतराव खेडकर (वय 75) यांचे शुक्रवारी दुपारी अल्पशा आजाराने इस्लामपुरात निधन झाले.

खेडकर दहा वर्षांपासून मधुमेहाने आजारी होते. त्यांच्यावर सहा महिन्यांपूर्वी हृदयशस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना वाळवा तालुक्यातील जुनेखेड या त्यांच्या मूळ गावी आणले होते. शस्त्रक्रियेनंतर त्यांची प्रकृती चांगली होती. शुक्रवारी छातीत दुखू लागल्याने त्यांना इस्लामपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र दुपारी साडे बाराच्या सुमारास त्यांचे निधन झाले. खेडकर यांनी 1964 ला अमरावती येथे तर 1965 ला नाशिक येथे महाराष्ट्र केसरी किताब मिळवला होता. त्यानंतर त्यांनी कोल्हापूर येथील शाहु तालीम आणि गंगावेस तालीम येथे अनेक मल्ल घडवले.

यामध्ये हिंदकेसरी हरिश्चंद्र बिरादार यांचा समावेश होता. बिरादार यांनी 1978 ला बेळगाव येथील मैदानात दिल्लीच्या सत्पालसिंग याला पराभूत केले होते. बिरादार यांच्या या कामगिरीत खेडकर यांचा मोलाचा वाटा होता.

(फोटो - ज्येष्ठ मल्ल गणपतराव खेडकर)