Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | double murder case in solapur

सोलापुरात अनैतिक संबंधाच्या कारणावरून दोघांचा खून

प्रतिनिधी | Update - Mar 02, 2012, 12:19 PM IST

नात्यातील मुलीशी अनैतिक संबंध ठेवल्याचा कारणावरून चौघांनी मिळून एका महिलेसह दोघांचा खून केला, तर एकावर प्राणघातक हल्ला केला.

  • double murder case in solapur

    सोलापूर - नात्यातील मुलीशी अनैतिक संबंध ठेवल्याचा कारणावरून चौघांनी मिळून एका महिलेसह दोघांचा खून केला, तर एकावर प्राणघातक हल्ला केला. ही घटना बुधवारी रात्री दक्षिण सोलापूर तालुक्यातील शंकरनगर तांडा येथे घडली. बदामी सागर भोसले (वय 25), हणमंत नामदेव राठोड (वय 45 दोघे रा. शंकरनगर ता. दक्षिण सोलापूर) अशी मृतांची नावे आहेत, तर आमरी गोपू भोसले (वय 30 रा. शंकरनगर, ता. दक्षिण सोलापूर) हे जखमी झाले आहेत. आमरीन आणि हणमंत यांचे एका मुलीशी अनैतिक संबंध होते. मुलीचे नातेवाईक अशीकार काळे, शेकू काळे, अर्म‍या काळे, बाल्या ऊर्फ बालाजी काळे यांनी या दोघांवर बुधवारी रात्री कुर्‍हाडीने हल्ला चढवला होता.Trending