Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | dr. apj abdul kalam in solapur

छोटी स्वप्ने पाहणे हा गुन्हाच : डॉ. कलाम

प्रतिनिधी | Update - Mar 02, 2012, 06:34 AM IST

युवकांनी मोठी स्वप्ने पाहिली पाहिजेत, विद्यार्थी दशेपासूनच युनिक बनण्यासाठीचे प्रयत्न केले पाहिजेत.

  • dr. apj abdul kalam in solapur

    सोलापूर - युवकांनी मोठी स्वप्ने पाहिली पाहिजेत, विद्यार्थी दशेपासूनच युनिक बनण्यासाठीचे प्रयत्न केले पाहिजेत. छोटी स्वप्ने पाहणे हाच गुन्हा आहे, असे प्रतिपादन माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी गुरुवारी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले.

    सोलापूर विद्यापीठातील इन्स्ट्रुमेंटेशन केंद्र व विज्ञान केंद्रात बहुद्देशीय सभागृहाचे उद्घाटन डॉ. कलाम यांच्या हस्ते करण्यात आले, या वेळी ते बोलत होते. युवकांशी संवाद साधण्यावर डॉ. कलाम यांचा मुख्यत: कल राहिला.

    अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. बाबासाहेब बंडगर होते. प्रमुख पाहुणे पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर, तसेच महापौर अरिप शेख, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बळीराम साठे उपस्थित होते.

    ‘मला डॉ. कलाम बनायचे आहे, त्यासाठी मार्गदर्शन करा’, असे सुयश गुरुकुलमधील इयत्ता आठवीतील विद्यार्थी रवी आयगोळे याने संवाद कार्यक्रमात विचारले. त्यावर डॉ. कलाम म्हणाले, की स्वत:चा चेहरा सदोदित आनंदी राहिला पाहिजे. अजून एक करा, तुमच्या आईचा चेहराही असाच आनंदी राहील यासाठी प्रयत्न करा. कारण त्यातून एक घर आनंदी राहील, पर्यायाने शहर, महाराष्ट्र व देश आनंदी राहील. प्रती पृथ्वी निर्माण करण्याचा ‘नासा’ प्रयत्न करत आहे काय? भारताचा अंतराळ कार्यक्रम कसा राबविला जातो? मिशन 3 बिलियन म्हणजे काय? असे अनेक प्रश्नही युवकांनी कलामचाचांना विचारले, त्यावर त्यांनी मुद्देसूद उत्तरे दिली. भारतातील 25 टक्क्यांपेक्षा जास्त नागरिक दारिद्रय़रेषेखाली राहत असतील तर ‘व्हीजन 2020’ चे स्वप्न कसे साकार होईल? या प्रश्नाला उत्तर देताना डॉ. कलाम म्हणाले, आपल्याकडे काय कमी आहे? फक्त आत्मविश्वास असला पाहिजे. गरज आहे ती हे स्वप्न साकारण्याच्या जिद्दीची. केवळ अणुऊर्जा ही देशाच्या ऊर्जेची गरज भागविण्याचे एक साधन मानता येणार नाही. कोळसा व जल स्रोतांसह सौर, पवन, हायड्रोजन आदी संमिर्श माध्यमांचा उपयोग भारतात होत आहे, त्याचेही महत्त्व असणार आहेच. जगभरात 549 अणुसंयंत्र कार्यरत आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.Trending