आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी कलाम सरांचा अभ्यास; 2 ऑगस्टला कोल्हापूरच्या दौ-यावर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर- ग्रामीण भागातील शाळकरी मुलांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दूल कलाम यांचा अभ्यास सुरू झाला आहे. ते कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील हरळी बु. येथे 2 ऑगस्टला येणार असून यावेळी सुमारे 1200 विद्यार्थ्यांशी ते संवाद साधणार आहेत.
पुणे येथील सिम्बायोसिस अभिमत विद्यापीठाने विद्यापीठाचे संस्थापक पद्मभूषण डॉ. शां.ब. मुजुमदार यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातील हरळी बु. या मूळ गावी माध्यमिक शाळेची स्थापना केली आहे. तेथील शाळेच्या भव्य इमारतीचे उदघाटन डॉ. कलाम यांच्या उपस्थितीत 2 ऑगस्ट रोजी सकाळी साडे अकरा वाजता होणार आहे.
पारंपरिक कार्यक्रमाला फाटा देऊन डॉ.कलाम हे यावेळी गडहिंग्लज तालुक्यातील 60 माध्यमिक शाळांमधून आलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. 20 जुलैपर्यंत या विद्यार्थ्यांचे प्रश्न संकलित करण्यात येणार असून त्यातील निवडक प्रश्न दिल्लीला डॉ. कलाम यांच्याकडे पाठवण्यात येणार आहेत. सिम्बायोसिसच्या प्रधान संचालिका डॉ. विद्या एरवडेकर आणि आरोग्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. राजीव एरवडेकर यांनी शनिवारी डॉ. कलाम यांच्या दौ-याच्या तयारीसाठी पाहणी केली. यावेळी डॉ. सतीश घाळी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
डॉ. कलाम देणारा पॉवर पार्इंट प्रेझेंटेशन- यावेळी डॉ. कलाम हे पॉवर पार्इंट प्रेझेंटेशन करणार असल्याची माहिती डॉ. विद्या एरवडेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मुलांचे प्रश्न निवडून त्याची तयारी डॉ. कलाम करणार आहेत. त्यासाठी या मुलांचा वयोगट, आर्थिक स्तर याबाबतची माहितीही त्यांनी मागितल्याचे डॉ. विद्या यांनी सांगितले.