आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्काळात पाण्यापासून मराठवाड्याला वंचित ठेवले : डॉ. दत्ता देशकर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर- ऐन दुष्काळातच मराठवाड्याला पाण्यापासून वंचित ठेवल्याचा आरोप भारतीय जलसंस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. दत्ता देशकर यांनी केला.
भारतीय जलसंस्कृती मंडळाच्या कोल्हापूर शाखेच्या वतीने दोन दिवसांच्या आठव्या जलसाहित्य संमेलनाला शनिवारी प्रारंभ झाला. या वेळी डॉ. देशकर बोलत होते. या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध साहित्यिक चंद्रकुमार नलगे उपस्थित होते. महाराष्टÑ शासनाच्या जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ पाटील यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन झाले. देशकर म्हणाले, मराठवाड्याला पाणी देताना अनेक पक्षांनी किती गोंधळ केला गेला यावरूनच सर्वांची मानसिकताही स्पष्ट होते. जलव्यवस्थापन ही काळाची गरज असल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले. या वेळी जलसाक्षरता कार्य करणारे प्रा. उल्हास परांजपे यांचा सत्कार करण्यात आला. रविवारी जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे यांच्या उपस्थितीत संमेलनाचा समारोप होणार आहे.