आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किरवले हत्याप्रकरणी मंगला पाटील अटकेत, हत्‍येच्‍या निषेधार्थ कोल्‍हापुरात बंद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- ज्येष्ठ विचारवंत डॉ. कृष्णा किरवले हत्या प्रकरणात संशयित प्रीतम पाटीलची आई मंगला हिला शनिवारी अटक केली. मंगलाने पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात स्पष्ट झालेे. प्रीतमने किरवले यांची हत्या केली तेव्हा मंगला घराबाहेर उभी होती. हल्ला करताना प्रीतमकडे सुतारकामाची हत्यारे ठेवण्याची बॅग होती. हल्ल्यानंतर त्याने सत्तूर या बॅगेत टाकला होता. ही बॅग मंगलाकडे देऊन तो मोटारसायकलवरून पसार झाला. दरम्यान या हत्येच्या निषेधार्थ शानिवारी कोल्हापुरात कडकडीत बंद पाळण्यात आला.
 
अशी घडली घटना.. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हाडा कॉलनी याठिकाणी किरवले यांचे घर आहे. काही दिवसांपूर्वी या घरात त्यांनी प्रितम पाटील याच्याकडून फर्निचरचे काही काम करून घेतले होते. घटनेच्या दिवशी प्रितम कामाचे पैसे मागण्यासाठी डॉ. किरवले यांच्या घरी गेला होता. त्यावेळी त्या दोघांमध्ये पैशाच्या व्यवहारावरुन काही वाद झाले. वाद सुरू असतानाच रागाच्या भरात प्रितमने धारदार शस्त्राने किरवले यांच्यावर वार केले. त्यामुळे किरवले रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळले. त्याचवेळी किरवले यांच्या पत्नी आल्या त्यांनी हा प्रकार पाहून आरडाओरडा केला. त्यानंतर  लोक जमा झाले. संशयिताबाबत माहिती मिळाल्यानंतर संतप्त जमावाने त्याच्या घरावर हल्ला करत, घरातील सामानाची तोडफोड केली. 
 
औरंगाबादेत घेतले होते शिक्षण...
डॉ.किरवले हे बीड जिल्ह्यातील सिरसाळा येथील रहिवासी होते. औरंगाबाद येथील मिलिंद कॉलेजमधून डॉ. कृष्णा किरवले यांनी शिक्षण घेतले होते.  तिथूनच त्यांच्यावर आंबेडकरी चळवळ आणि विचारांचे संस्कार झाले होते.

डॉ.कृष्णा किरवले हे 2012 साली जळगावात पार पडलेल्या 31व्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. 'आंबेडकरी जलसा'वर त्यांनी ऐतिहासिक संशोधन केले होते. , आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ अभ्यासक म्हणूनही त्यांची ख्याती होती.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...