Home | Maharashtra | Western Maharashtra | Kolhapur | Drupti Desai Beaten Up In Kolhapur

VIDEO: केस ओढले, कपडे फाडले, जीवे मारण्याची दिली धमकी -तृप्ती देसाई

प्रतिनिधी | Update - Jan 03, 2019, 07:21 PM IST

'ड्रेस कोड' धुडकावून भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरातील गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेतल्याने भाविकांनी त्यांना मारहाण केली.

 • Drupti Desai Beaten Up In Kolhapur
  महालक्ष्मी मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न करताना तृप्ती देसाई यांना अशी धक्काबुक्की करण्यात आली.
  कोल्हापूर- 'ड्रेस कोड' धुडकावून भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरातील गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेतल्याने भाविकांनी त्यांना मारहाण केली. भाविकांच्या तावडीतून सोडवून त्यांना बाहेर आणताना पोलिसांची तारांबळ उडाली. रात्री त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. तृप्ती यांनी साडी घालून दर्शन घ्यावे, अशी स्थानिकांची मागणी होती. मात्र, त्यांनी पंजाबी ड्रेस घालून देवीचे दर्शन घेतले. दरम्यान, मला ठार मारण्याचा प्रयत्न होता, असा आरोप तृप्ती देसाई यांनी केला आहे.

  तृप्ती यांना पोलिस बंदोबस्तात ७.३० च्या सुमारास मंदिरात आणण्यात आले. या वेळी महिला पोलिसांनी कडे करत त्यांना दर्शनासाठी आत नेले. मात्र गाभाऱ्याजवळ येताच भाविकांचा गोंधळ सुरू झाला. अशातच पोलिसांनी तृप्ती यांना गाभाऱ्यात जेथे श्रीपूजक बसतात तेथे नेले व दर्शन करवून बाहेर आणले.
  मात्र, मोठ्या संख्येने जमलेल्या स्थानिक महिला भाविकांनी देसाई यांना मारहाण केली. या वेळी काही पुजाऱ्यांनीही धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला. नुकत्याच झालेल्या निर्णयानुसार महिलांना गाभाऱ्यात प्रवेशाची परवानगी देण्यात आली होती. तथापि, महिलांनी 'ड्रेस कोड' म्हणजे साडी परिधान करून दर्शन घ्यावे, अशी अट घातली होती.
  परिसरातील दुकाने बंद, मंदिर परिसरात होती शांतता
  तृप्ती देसाई महालक्ष्मी मंदिराच्या गाभाऱ्यात पंजाबी ड्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची बातमी पसरल्याने शिवसेना आणि इतर हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते मंदिर परिसरात जमले होते. त्यामुळे काही तरी अघटीत घडण्याची शक्यता गृहित धरुन परिसरातील दुकाने बंद ठेवण्यात आली होती. मंदिर परिसरात प्रचंड तणाव दिसून येत होता.
  तृप्ती देसाई यांच्या प्रकृतीत सुधारणा
  तप्ती देसाई यांच्यावर कोल्हापुरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. डॉ. अर्जुन अदनिक यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरांनी टीम त्यांच्यावर उपचार करत होती. त्यांच्यावर लकव्याचा अटॅक झाला असावा असा डॉक्टरांना संशय होता. रुग्णालयात आणले तेव्हा त्यांच्या शरीरात पाणी कमी होते. ब्लड प्रेशन कमी झाले होते. शुगर लेव्हलही खाली आली होती. पण आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. आता त्यांना डिस्चार्ज देण्यात आले आहे, असे डॉ. अदनिक यांनी सांगितले.
  मला ठार मारण्याचा प्रयत्न -तृप्ती देसाई
  सनातन संस्थेच्या कार्यकर्त्यांसह स्थानिक भाविकांनी मला ठार मारण्याचा प्रयत्न केला असा गंभीर आरोप तृप्ती देसाई यांनी केला आहे. माझे केस ओढले. माझे कपडे फाडले. मला अश्लिल शब्दांत शिव्या दिल्या. मला ठार मारण्याचा त्यांचा प्रयत्न होता, असे देसाई म्हणाल्या आहेत.

  पुढे वाचा.. पोलिस अधिकाऱ्याने फोन करुन दिला होता साडी नेसण्याचा सल्ला... त्र्यंबकेश्वरमध्येही तयार झाले तणावाचे वातावरण...

 • Drupti Desai Beaten Up In Kolhapur
  तृप्ती देसाई यांना ताब्यात घेताना पोलिस कर्मचारी.
  यापूर्वी कोल्हापूर पोलिसांनी तृप्ती देसाईला ताब्यात घेतले होते
   
  भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांसह महालक्ष्मी मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्यासाठी जात असलेल्या तृप्ती देसाई यांना पोलिसांनी तारा राणी चौकात ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांना दुसऱ्या ठिकाणी नेण्यात येत होते. त्यापूर्वी त्यांनी तारा राणी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला होता.
   
  अतिरिक्त पोलिस आयुक्तांनी महालक्ष्मी मंदिर परिसरात 144 कलम लागू केले आहे. त्याचे उल्लंघन केल्याने देसाई यांच्यासह महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले होते.
   
  पुढील स्लाईडवर वाचा... पोलिस अधिकाऱ्याने फोन करुन दिला होता सल्ला
 • Drupti Desai Beaten Up In Kolhapur
  रुग्णालयात उपचार घेताना तृप्ती देसाई.
  पोलिस अधिकाऱ्याने फोन करुन दिला होता सल्ला
   
  कोल्हापुरच्या राजवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी अनिल देशमुख यांनी प्रवेशाच्या आदल्या दिवशी तृप्ती देसाई यांना फोन केला होता. महालक्ष्मी मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करताना तुम्ही साडी नेसूनच जा असा सल्ला यावेळी देखमुख यांनी दिला होता. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आपण आम्हाला मदत करा, असेही ते यावेळी म्हणाले होते.
   
  अनेक वर्षांपासून सुरु असलेली प्रथा मोडत मंदिर प्रशासनाने महिलांना गाभाऱ्यात प्रवेश दिला आहे. पण महिलांनी गाभाऱ्यात येताना साडी नेसावी अशी अट घालण्यात आली आहे. या मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करायचा असेल तर पुरुषांनाही सोहळ्यात जावे लागते.
   
  पुढील स्लाईडवर वाचा... महालक्ष्मी मंदिरात झाली धक्काबुक्की
 • Drupti Desai Beaten Up In Kolhapur
  महालक्ष्मी मंदिरात तृप्ती देसाई यांनी धक्काबुक्की करण्यात आली.
  महालक्ष्मी मंदिरात झाली धक्काबुक्की
   
  तृप्ती देसाई यांनी कार्यकर्त्यांसह मंदिरात पंजाबी ड्रेसमध्ये प्रवेश केल्याने संतप्त भाविक आणि कार्यकर्त्यांमध्ये जरा हाणामारी झाली. त्यानंतर देसाई यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
   
  पुढील स्लाईडवर वाचा... त्र्यंबकेश्वरमध्येही तणावाचे वातावरण
 • Drupti Desai Beaten Up In Kolhapur
  त्र्यंबकेश्वरमध्येही तणावाचे वातावरण

  त्र्यंबकेश्वर | मंदिराच्या गर्भगृहात प्रवेशावरून स्वराज्य महिला संघटनेने बुधवारी थेट मंदिरात आंदोलन केल्याने तणाव निर्माण झाला. देवस्थानचे नियम व याबाबत न्यायालयात दाखल बाबींची कल्पना दिल्यानंतरही या महिला गर्भगृहाच्या दरवाजापासून हटत नव्हत्या.
  दरम्यान, दुपारी त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश केलेल्या या महिलांनी अखेर सायंकाळी सातनंतर मंदिराच्या प्रांगणात आपला मोर्चा वळवून उद्या (दि. १४) पुन्हा दर्शनासाठी जाणार असून, अडवणूक केल्यास जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा दिला.

Trending