आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Due To Money Lender's Presser Farmer Committeed Suicide In Home Minister Village

सावकारी जाचामुळे गृहमंत्र्यांच्या गावात शेतक-याची आत्महत्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली - गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्या अंजनी (ता. तासगाव) गावातील शेतक-याने सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. राजू हरिबा शिंदे (वय 22) यांनी जयसिंग वडर याच्या मध्यस्थीने सावकार यल्लाप्पा दोडमणी याच्याकडून 2 लाख रुपये कर्ज घेतले होते. त्यापैकी काही रक्कम शिंदे यांनी परतही केली होती. मात्र वसुलीसाठी दोडमणी याचा तगादा सुरू होता. याला कंटाळून राजू यांनी आठ महिन्यांपूर्वी गळफास घेतला होता. तेव्हा कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या अशी नोंद झाली होती. त्यानंतरही दोडमणीने राजू यांचा भाऊ सुनील व वडरकडे पैशासाठी तगादा लावला होता. सोमवारी दोडमणी याला एका प्रकरणात अटक झाल्यानंतर सुनील यांनी दोडमणीच्या तगाद्यामुळेच राजूने आत्महत्या केल्याची फिर्याद दिली.