आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशीलकुमार शिंदे ‘पीएम’ व्हावेत : पाटील

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- ‘आगामी लोकसभा निवडणुकीनंतर सुशीलकुमार शिंदे हे या देशाचे पंतप्रधान झाल्याचे चित्र पाहावयास मिळावे,’ अशी अपेक्षा ओरिसाचे माजी राज्यपाल डी. वाय. पाटील यांनी शुक्रवारी व्यक्त केली.

एका खासगी प्रतिष्ठानच्या शुभारंभप्रसंगी उपस्थित असलेल्या शिंदे यांनीही पाटील यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. ‘डी. वाय. पाटील आणि आपण विधानसभेमध्ये शेजारी बसत असू. एका शेतकरी घरात जन्म घेतल्यानंतरही डी. वाय. यांनी ज्या पद्धतीने शिक्षण, हाॅटेल, क्रीडा यासारख्या वैविध्यपूर्ण क्षेत्रामध्ये मोठे काम उभे केले याचे मला नेहमीच कौतुक वाटते,’ असे गौरवोद्गार शिंदे यांनी काढले.

हाच धागा पकडत डी. वाय. पाटील यांनी सुशीलकुमार शिंदे हे भविष्यात या देशाचे पंतप्रधान व्हावेत अशी आपली इच्छा असल्याचे सांगितले. ज्या पद्धतीने शिंदे यांनी आपले आयुष्य घडवले आहे. ते पाहता हे स्वप्न पूर्ण होण्यास हरकत नाही, अशाही शुभेच्छा त्यांनी दिल्या.