आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रत्येक महाविद्यालयात विवेक निर्धार संवाद,चळवळ वाढवण्यासाठी ‘अंनिस’ची मोहीम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा निषेध करत मोठ्या प्रमाणात तरुण आमच्या चळवळीच्या पाठीशी आहेत. या तरुणांना चळवळीत आणण्यासाठी आम्ही राज्यातील महाविद्यालयांतून विवेक निर्धार संवादाचे आयोजन करत आहे. त्याची सुरुवात आज सांगली जिल्ह्यातून केल्याची माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत दिली. या वेळी मुक्ता दाभोलकर उपस्थित होत्या.


पाटील म्हणाले, ‘डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचा निषेध अंनिसचे कायकर्ते कृतीतून व्यक्त करत आहेत. दाभोलकरांचे विवेकी विचारांचे कार्य अधिक जोमाने पुढे नेण्यासाठी 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या काळात अंनिसच्या सभासद नोंदणीची मोहीम राबवण्यात येणार आहे. जादूटोणाविरोधी कायद्याबाबत पोलिसांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारीही अंनिसने घेतली आहे, असे ते म्हणाले.


नेतृत्व कार्यकर्त्यांकडे : मुक्ता
मुक्ता म्हणाल्या, ‘जादूटोणाविरोधी कायदा देशभर व्हावा, अशी भावना वेगवेगळ्या राज्यांतील कार्यकर्त्यांनी आमच्याकडे व्यक्त केली. त्याबाबत चर्चा करण्यासाठी आम्ही नुकतेच दिल्लीत जाऊन आलो. डॉक्टरांच्या पश्चात संघटनेचे नेतृत्व आम्ही नव्हे तर कार्यकर्तेच करतील, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.