आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षणाची परिस्थिती चिंताजनक : पवार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर -‘असर’ संस्थेचा अहवाल आल्यानंतर देशभरातील प्राथमिक शिक्षणाबाबत आपल्याला चिंता वाटत असून दर्जा खालावलेल्या राज्यांत पुरोगामी महाराष्ट्राचा समावेश विचार करायला लावणारा आहे, असे प्रतिपादन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवाच्या सांगताप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी कुलगुरू रा. कृ. कणबरकर होते. यशवंतराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीतून उभारलेल्या या विद्यापीठाने अनेक क्षेत्रांत प्रगती केली असून केवळ उत्तम विद्यार्थीच नव्हे, तर उत्तम कुलगुरू तयार करण्याची कामगिरी केली आहे, असे गौरवोद्गार पवार यांनी काढले. सध्याची पाणीटंचाई व दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कमी पाण्यावर पिके कशी घेता येईल याचा विचार होण्याची गरज असल्याचे मत पवार यांनी व्यक्त केले.